मालेगाव (जय योगेश पगारे ) तालुक्यातील दहिवाळ शिवारात मयत गणेश नाना निकम या तरुणाचा विजेचा तीव्र झटक्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Man electrocuted today
याबाबत सविस्तर माहिती अशी की आपल्या शेताच्या बांधावर लाकडी खुंट्यावर बायडिंग तारला विजप्रवाह सोडून त्यामुळे एखाद्या व्यक्तिचा मृत्यू होवु शकतो हे माहित असतांना देखील जाणीवपूर्वक तार बांधून त्यात करंट (electric current) सोडून गणेश नाना निकम, ३२ वर्ष.रा रोझे. ता मालेगाव जि. नाशिक या तरुणाच्या मृत्युस कारणीभूत झाल्यामुळे शेतमालकावर गु. र. न. ६७९/२०२१ भांदवि कलम ३०४ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Youth dies of electric shock in farm at dahiwal shivar malegaon)
सदर घटनेप्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीने तालुका पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून तालुका पोलिस ठाण्यात मृत्यु रजि. नं. ७०/२०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोउपनि विशाल पाटील करीत आहेत
Electric shock accident news today