📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

काल शाळा सुरू करणे संदर्भात निर्गमित झालेले पत्रक रद्द

 दिनांक ५ जुलै रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे एक अत्यंत महत्वाचे पत्रक निर्गमित झाले ज्यात कोरोना मुक्त गावातील शाळेत पूर्व परवानगी घेऊन इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास तसेच सुरू केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे संदर्भात संबंधित विभागाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या होत्या.

आज प्राप्त माहिती नुसार शालेय शिक्षण विभागाचे काल शाळा सुरू करणे संदर्भात निर्गमित झालेले पत्रक रद्द केले असल्याची माहिती मिळाली आहे.राज्यात अद्याप कोरोनाचा धोका टाळला नसल्याने सदरील पत्रक मागे घेण्यात आले.तसेच शाळा सुरू करणे संदर्भात सुधारीत पत्रक पुढील काळात निर्गमित होईल अशी माहिती समोर आली आहे. सदरील पत्रक मागे घेतल्याने राज्यातील शिक्षक,विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने