📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

तिरुपती बालाजी येथे निघालेल्या वाहनाला अपघात होऊन तालुक्यातील चार जण ठार

मालेगाव: तिरुपती बालाजी येथे निघालेल्या तरुणांच्या वाहनाला अपघात होऊन चार जण ठार झाले , तिरुपती बालाजी ला फिरायला निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला उभी केली होती. याच वेळेला टेम्पोला एका आयशर ट्रकने मागून जबर धडक दिली. आयशरच्या धडकेनंतर टेम्पो सात ते आठ फुट खोल खाली गेला. तर आयशर उलटला. यात टेम्पोसमोर बसलेले तरुण जागीच ठार झाले. या अपघातात शरद देवरे (वडगाव), जगदीश दरेकर, सतीष सुर्यवंशी (दोघे रा. दरेगाव) व विलास बच्छाव (सायने) हे  जागीच ठार झाले. सर्व तरुण ४० ते ४५ वयोगटातील व्यावसायिक होते जवळपास अठरा जण फिरायला निघाले होते,
 कुटुंबातील कर्त्या तरुणांच्या निधनामुळे शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे. व्यवसायीकांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. चाळीसगाव फाट्यावर आज शुकशुकाट होता.
सायने गावातील बंद




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने