📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ह्रदयद्रावक: आईला वाचविण्यास गेलेल्या लेकराचाही आईसोबत शॉक लागून मृत्यू 😭

बाचणी (ता. कागल) येथील अत्यंत वेदनादायक घटनेत माय लेकरांचा अंगावर उच्च विद्युत वाहिनीची तार खांबावरुन तुटून पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला. गीता गौतम जाधव (वय 32) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय १४) असे मृत्यु झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत भक्ती गौतम जाधव बारा वर्षाची चिमुरडी बचावली. तिच्यामुळेच घटनेची माहिती घरी समजली.

आपल्या आईच्या अंगावर विजेची तार पडली असल्याचे बघून हर्षवर्धन आईला वाचवायला गेला परंतु विजेचा धक्का एवढा मोठा होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गीता जाधव आपल्या दोन मुलांसह मंगळवारी दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता घराच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीकडे कपडे धुण्यास गेल्या होत्या. काम उरकल्यानंतर ऊसाच्या शेतातून माघारी परतत असताना विजेची उच्च दाबाची विद्युत खांबावरील प्रवाहीत तार तुटून गीता यांच्या अंगावर पडली. यावेळी आईला वाचवण्यास गेलेला 14 वर्षाचा मुलगा हर्षवर्धन गौतम जाधव याला जोराचा शॉक बसला. या दुर्घटनेत माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने