मालेगाव (जय योगेश पगारे ) रोजच्या आयुष्यात माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये आणखी एका गोष्टीची वाढ झाली आहे आणि ती म्हणजे मोबाईल, आणि आता तर इंटरनेट व स्मार्ट फोन मधली एप्लिकेशन्स हे जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे सर्वाधिक वापरले जाणारे ॲप व्हाट्सअप हे तर प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असलेच पाहिजे, त्यामुळे जगाची एकमेकांशी जवळीक वाढली आहे संदेश फोटो व्हिडिओ यांची देवाण-घेवाण अगदीच सोपी झाली आहे सुरुवातीला व्हाट्सअप वरून केवळ फोटो पाठवणे व्हिडिओ पाठवणे या गोष्टी होत होत्या परंतु हळूहळू त्यामध्ये नवनवीन सुधारणा करत व्हाट्सअप ने वापरकर्त्यांच्या मनातील त्याचे स्थान अबाधित ठेवत वापरकर्त्यांना गुंतवून ठेवले आहे आज दि. १९ रोजी आणखी एक भन्नाट फीचर व्हाट्सअप ने वापरकर्त्यांच्या सेवेसाठी आणले आहे ज्यामध्ये केवळ एकाच वेळी बघण्याजोगा व्हिडिओ किंवा फोटो पाठवता येतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीने बघितल्यानंतर ताबडतोब तो डिलीट होतो, या फिचर मुळे वापरकर्त्यांना काय फायदा होईल हे काळच ठरवेल, परंतु अशा नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणून वापरकर्त्यांना आपल्या सोबत जोडून ठेवण्याचे काम व्हाट्सअप करीत आहे
या फिचरचा उपयोग शक्यतो केवळ एकच वेळा एखादा संदेश पाठवायचा असेल किंवा अति जास्त प्रायव्हसी जपायचे असेल त्या वेळेस केला जाऊ शकतो परंतु काही लोक याचा दुरुपयोग करू शकतात पण त्यांच्या माहितीसाठी पोलिसांच्या सायबर क्राईम डिपार्टमेंट मध्ये सर्व प्रकारचे डिलीट झालेले मेसेजही रिकव्हर करण्याची ताकत असते त्यामुळे अशा सुविधांचा उपयोग केवळ चांगल्या कामासाठी करावा
