नामपूर दि. १० (मनोहर शेवाळे - कसमादे मिडिया ) नामपूर येथील आंबेडकर नगर येथील राजनंदिनी प्रकाश निकम ह्या महिलेले राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने सासरचे लोक मारहाण करतील या भीतीने जायखेडा पोलिस ठाण्यात धाव घेतली, व पोलिसांकडे अभय मागीतला, त्यांनंतर प्रकाश भीमराव निकम याने पोलिस स्टेशन मध्येच गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. 10 ) सकाळी जायखेडा येथे घडली. राजनंदिनी प्रकाश निकम (वय-26), प्रकाश भीमराव निकम (वय-32, रा. आंबेडकर नगर, नामपूर ) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पत्नीने घरात गळफास घेत आत्महत्या केली पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने महिलेच्या माहेरकडील लोक मारहाण करतील या भीतीने जायखेडा पोलिस ठाण्यात धाव घेतली, व पोलिसांकडे अभय मागीतला पोलिसांनी माणुसकी दाखवत सदर व्यक्तीस जायखेडा पोलीस ठाण्यात आश्रय दिल्याची प्राथमिक माहिती मिळतेय, तर दुसरीकडे मयत तरुणाचे नातेवाईक पोलिसांनी सदर व्यक्तीस आश्रय का दिला याबाबत विचारणा करीत आहेत
सदर प्रकरण मयत तरुणाच्या भावाच्या सांगण्यानुसार पोलिसांनी आपल्या भावाला संरक्षणाची पोलीस ठाण्यात नेले असे सांगितले, दुसरीकडे महिलेच्या नातेवाईकांनी आक्रोश करत निष्पक्ष तपासाची मागणी केली, सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते
