📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सटाणा: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको; वाहतूक ठप्प!

सटाणा (मनोहर शेवाळे- कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क) 

*कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको...
*सटाणा-ताहराबाद मार्गावर केला रस्ता रोको...
*व्यापारी कांद्याला कमी भाव देत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी उतरले रस्त्यावर...

कोरोना मुळे आधीच बळीराजाचे कंबरडे मोडले असताना व्यापार्‍यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मनमानी करत कांद्याचे भाव पडून देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला

सटाणा ताहराबाद रोडवरील करंजाड उपबाजार समितीमध्ये बोल लावताना वाद झाला, या मनमानी विरुद्ध कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सटाणा ताहराबाद मार्गावर  रस्ता रोको केला आहे

 व्यापारी मनमानी करून इतर बाजार समितीच्या तुलनेत येथे कांद्याचे भाव पडतात असा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी सटाणा-तहाराबाद मार्गावर रस्ता रोको केला.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती व व्यापाऱ्यां विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे वाहनांची रांग लागून वाहतूक ठप्प झाली होती..इतर बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल इतकं भाव मिळत असतांना सटाणा उप बाजार समितीत मात्र व्यापारी 1200 ते 1300 रुपये इतकंच भाव देत आहे त्यामुळे आमची आर्थिक लूट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून या मनमानी विरुद्ध आम्ही रस्ता रोको केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने