📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ब्रेकिंग न्यूज: गॅस सिलिंडर महागले

 तेल कंपन्यांनी घरगुती गॅस किंमतीत वाढ केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या  किंमती तब्बल 25.50 रुपयांनी वाढल्या आहेत. हे नवे दर आज (1 जुलै) पासून लागू केले जाणार आहेत. 

👉🏻दिल्ली आणि मुंबई मध्ये 14 किलोच्या अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 834.50 रुपये इतकी आहे. तर कोलकाता मध्ये 835.50 रुपये असून चेन्नई मध्ये 850.50 रुपये इतकी आहे. 

👉🏻त्याचबरोबर 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये तब्बल 84 रुपयांची वाढ करण्यात आल्याने 19 किलोचा एलपीजी सिलिंडरचा भाव आता 1507 रुपये इतका झाला आहे. मे आणि जून महिन्यात या सिलिंडरचे भाव कमी करण्यात आले होते. वाढीव दरानुसार मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव 1507 रुपये, दिल्लीत 1550 रुपये, कोलकाता मध्ये 1651.50 रुपये आणि चेन्नईत 1687.5 रुपये इतका झाला आहे.

🛑 6 महिन्यांत 140 रुपयांची वाढ

2021 च्या सुरुवातीला दिल्लीत सिलिंडरचा दर 694 रुपये होता. आता हाच दर 834.50 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ 6 महिन्यांत सिलिंडरची किंमत 140 रुपयांना वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने