सोयगाव ( जय योगेश पगारे ) सोयगाव टेहेरे चौफुली येथील चौकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, अवजड वाहने व निकृष्ट कामाचा दर्जा यामुळे काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कामाचा पुरता खुळखुळा झाला आहे, रस्त्यावर अक्षरश: दगड गोटे धूळ माती दिसत आहे, अशामुळे रोजच्या रोज छोट्या-मोठ्या अपघातास निमंत्रण मिळत आहे,
गिरणा नदीवर मोठा पूल झाल्यावर जुन्या गिरणा पुलावरून जाणारी वाहतूक अंतर टाळण्यासाठी सोयगाव मधून येत आहे, तसेच या चौकातून सटाणा नाशिक मुंबई सुरत अशा अनेक ठिकाणी जाणारे वाहने याच चौकातून जात असत, नामपुर व परिसरातील सर्व वाहने शॉर्टकट साठी याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे सदर चौकात नियमित लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते, डिसेंबर महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु कामाचा निकृष्ट दर्जा व वाढती ट्राफिक यामुळे रस्त्याची चाळणी झाली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांचा तीव्र संताप होत आहे, या ठिकाणाहून जाणारे दुचाकी स्लीप होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे जबाबदार अधिकारी प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष टाळावे व त्वरित कार्यवाही करत सदर चौकाचे सुशोभिकरण करण्यासह मजबुतीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे..
बच्छाव सर्कलचे काय झाले?
सदर चौकाला बच्छाव सर्कल असे नामकरण करण्यात यावे असे गेल्या पाच वर्षापासून मागणी आहे, अनेक लोकप्रतिनिधींनी या चौकाच्या नामकरणास सहमती दर्शवली होती, परंतु अद्याप पावेतो कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप होत आहे,
या प्रभागाशी संबंधित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ या चौकाचे सुशोभिकरण करावे अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे
- अमित कैलास बच्छाव