रशियाची स्फुटनिक वि लस असलेले विमान आज भारतात दाखल झाले असून पहिल्या खेपेत दीड लाख डोस उपलब्ध झाले आहेत, यामुळे लसीकरनाचा वेग वाढणार असून कोरोना चा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. देशात आजपासून १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
सध्या भारतात किोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या २ लस वापरल्या जात आहेत. रशियाहून आज स्पुटनिक व्ही भारतात पोहोचल्याने तिसरी लस उपलब्ध झाली आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोरोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. स्पुटनिक व्ही कोरोनाच्या नव्या विषाणूवरही मारक ठरत आहे. या लसीचं देशात लवकरच प्रोडक्शन सुरु होईल आणि वर्षाकाठी ८५० दशलक्ष डोस तयार करण्याचान मानस आहे. असे रशियाच्या राजदूतांनी सांगितले