📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

खळबळजनक : लस न देता मोठ्या प्रमाणात कचऱ्यात टाकल्या सिरिंज; नर्सवर गुन्हा दाखल

अलिगड: एएनएम निहा खानविरूद्ध एफआयआर दाखल ,  कोविड लसी चे इंजेक्शन न दिल्याचे आढळले.

उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यातील लसीच्या अपव्यय प्रकरणात नुकत्याच झालेल्या खळबळजनक घटनेत  एएनएम (सहाय्यक परिचारिका) निहा खान वर डस्टबिनमध्ये 29 लसींनी भरलेल्या सिरिंज फेकल्याचा आरोप आहे, अशी माहिती झी हिंदुस्तानने दिली आहे.

जमालपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (यूपीएचसी) नियुक्त झालेल्या वर  लाभार्थ्याला लास ण देताच डस्टबिनमध्ये व्हायल  टाकल्याचा आरोप आहे. ती लाभार्थी च्या शरीरात सुई टोचायची परंतु केवळ सुई राहू देऊन सिरिज मोठया शिताफिने लपवून कचऱ्यात फेकून द्यायची त्यामुळे पुष्कळ जणांना मूळ लस टोचलीचं गेली नाही.


वरील युपीएचसीच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातील लसीच्या डोसची 29 इंजेक्शन्स डस्टबिनमध्ये सापडल्यानंतर ही बाब उघडकीस आली. अलिगढचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. भानु प्रताप कल्याणी यांनी अतिरिक्त सीएमओ डॉ. एमके माथुर आणि उप-सीएमओ दुर्गेश कुमार यांच्या समितीने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशी समितीने जमालपूर यूपीएचसीच्या ए.एन.एम. खान सह इतर कर्मचार्‍यांची चौकशी केली आणि अहवाल सादर केला त्यानंतर अलीगढ़चे जिल्हाधिकारी चंद्र भूषण सिंग यांनी खानला कारणे दाखवा नोटीस पाठविली. तिला सेवेतून निलंबित करण्याचे निर्देशही डीएम यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

याव्यतिरिक्त, यूपीएचसीचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आफरीन  या प्रकरणाचा तपशील लपविल्याबद्दल दोषी आढळले आहे. तिने खान यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही किंवा खानच्या कृत्यांबद्दल तिच्या वरिष्ठांना माहिती दिली नाही.

हे लक्षात घेतले पाहिजे की खान यांनी फसवणूक केलेले प्राप्तकर्ते 18-44 वयोगटातील आहेत. व प्रक्रियेनुसार पोर्टल वर या सर्वांनी लास घेतली असे नोंद झाले आहे, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने