दिनांक ४/०५/२०२१ रोजी रात्री गिरणा पंपीग स्टेशन जवळ पाइप लाइन वर मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाल्याने, सदर पाणी गळती बंद करणेकरीता पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने त्वरीत जागेवर पोहचून युद्धपातळीवर पाणी गळती बंद करणेकरीता काम सुरू केले. अतिशय अवघड जागेवर काम करत असताना अनेक अडचणींना तोंड देत पाणी पुरवठा विभागाचे पथक पहाटे पाणी गळती बंद करण्यात यशस्वी झाले. सदर कामामुळे आज दिनांक ५/०५/२०२१(बुधवार)*रोजी नियोजित असलेला पाणी पुरवठा नेहमीच्या वेळेपेक्षा *७ ते ८ तास* उशिराने सुरू होईल. कृपया सर्वानी नोंद घ्यावी. असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे
मालेगावातील आजचा नियोजित पाणी पुरवठा नेहमीच्या वेळेपेक्षा ७ ते ८ तास उशिराने
0