मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे व घेणे कायद्याने गुन्हा. कोविडमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायपणाचा फायदा घेणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई होणार. अशा घटनांना रोखण्यासाठी १०९८ किंवा ८३२९०४१५३१ या हेल्पलाईनवर माहिती द्यावी महिला व बालविकास विभागाचे आवाहन
अनाथ बालकांना संकट काळात मदत मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रेनच्या (इंडिया) संयुक्त विद्यमाने विशेष मदत कक्ष स्थापन. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ८३०८९९२२२२ आणि ७४०००१५५१८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार.
कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन. दत्तक विधान प्रक्रियेची माहिती http: //cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.