📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

धक्कादायक! भिवंडीत मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

मुंबई (प्रतिनिधी) भिवंडीमधे मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एक ला यश मिळाले. ज्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्सचा समावेश आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये पोलिसांनी 12 हजार जिलेटिन कांड्या आणि ३ हजारपेक्षा जास्त डिटोनेटर्स जप्त केले आहेत.

या सर्व जिलेटिन कांड्या 60 बॉक्समध्ये पॅक केलेल्या होत्या. प्रत्येक बॉक्समध्ये 190 कांड्या होत्या. 

कारीवाली गावात मित्तल एन्टरप्रायजेसमध्ये स्फोटकांचा मोठा साठा साठवून ठेवल्याची माहिती समोर आली होती. ही धाड टाकण्यासाठी पोलिसांनी 1 टीम बनवली

ठाणे पोलिसांनी या प्रकरणात गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे वय 53 याला अटक केली आहे. “आरोपी इमारती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करतो आणि पेशाने खाण कंत्राटदार आहे. भिवंडी कालवर भागात आरोपी राहतो. त्याने दोन खोल्यांमध्ये स्फोटके ठेवली होती. कारीवाली गावातील महेश स्टोन चाळ येथे रुम्स आहेत” असे गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने