कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी याबाबत चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे. लहान मुलांना संसर्ग होणार याबाबत कोणतेच पुरावे नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ()
पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलांना तितक्या प्रमाणात संसर्ग झाला नाही, त्यामुळे तिसऱ्या लाटेत त्याचा लहान मुलांवर तितकासा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, असे त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना रणदीप गुलेरिया म्हणाले की,“मागच्या काही शक्यता तपासून लहान मुलांना कोरोनाची लागण होईल असं सांगण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाला नव्हता. त्याचबरोबर त्यांना लसही देण्यात आलेली नाही. त्यामुळे तसा अंदाज बांधला जात आहे. मात्र त्याला कोणताच पुरावा नाही.
कोरोना काळात मानसिक तणाव, स्मार्टफोनचं व्यसन आणि अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी यामुळे मुलांना त्रास होऊ शकतो”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी ९५ टक्के बालकांना सौम्य लक्षणे असतील आणि ती गृहविलगीकरणातच बरी होतील. तेव्हा तिसऱ्या लाटेचे भय बाळगू नका, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांच्या कृतिदलाने डॉक्टरांना दिला आहे.
चाचणी करणे आवश्यक
कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी बालकांची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकही सतर्कतेने पाल्याची काळजी घेतात आणि लक्षणांमधील बदलांवर बारकाईने लक्ष देतात. बालकांची प्रतिजन चाचणी किंवा आरटीपीसीआर चाचणी करता येते; परंतु बालकांमध्ये आजाराचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅन किंवा इतर कोणत्याही चाचण्या करू नयेत, असे डॉ. प्रभू यांनी स्पष्ट केले
परंतु तरीही गाफील न राहता वेळोवेळी हाथ धुणे, गर्दी टाळणे, लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे, मालेगाव लाइव्ह आपल्या सर्व वाचकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देते !
A third wave of corona is feared to infect young children. However, AIIMS director Randeep Guleria said there was no reason to worry. He said there was no evidence that children would be infected. ()
"The first and second corona waves did not affect the children as much, so I don't think the third wave will affect the children as much," he said.
Speaking further, Randeep Guleria said, "After examining some of the possibilities, it is being said that children will be infected with corona. The first and second waves did not infect young children. They were also not vaccinated. Therefore, such a prediction is being made. But he has no proof.
During the Corona period, mental stress, smartphone addiction and study difficulties can cause problems for children, ”he added.
Even if a child is infected with a corona, 95% of children will have mild symptoms and will recover with home detachment. So don't be afraid of the third wave, the team of pediatricians has advised the doctors.
Must be tested
Pediatric testing is necessary to diagnose corona infection. Therefore, parents also take care of the child carefully and pay close attention to the changes in the symptoms. Infants can be tested for antigen or RTPCR; But CT scans or any other tests should not be done to diagnose the disease in children, said Dr. Explained the Dr. prabhu
But still it is important to wash your hands from time to time, avoid crowds, seek medical advice immediately if symptoms appear, Malegaon Live advises all its readers to be careful!