📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दोन दिवसात व्हॅक्सिनेशन पूर्ववत होण्याची शक्यता.

मालेगाव दि. ४ (जययोगेश पगारे) मालेगाव शहरातही 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी देखील लसीकरणाची सुरुवात झालेली आहे सद्यस्थितीत निमा 2 येथे रजिस्ट्रेशन झालेल्या 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येत आहे, लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन आणि शेड्युल या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत शेड्युल केल्यानंतर आपल्याला लसीकरणाचे ठिकाण निवडावे लागते त्यानंतर सदर ठिकाणी जाऊन लसीकरण पूर्ण होते.
परंतु गेल्या दोन चार दिवसात बऱ्याच लोकांना लसीकरण शेड्युल न होण्याची अडचण येत आहे, शिवाय 45 वयोगटावरील लसीकरणाच्या लस सध्या उपलब्ध नाहीत त्यामुळे 45 वर्ष वयोगट वरील लसीकरण तूर्तास बंद आहे, याबाबत महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, उद्या दि.५ मे नंतर 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, लस उपलब्ध झाल्यास पुन्हा 45 वर्ष व पुढील वयोगटासाठी लसीकरण पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती डॉ. ठाकरे यांनी दिली.
18 ते 44 वयोगटातील ज्या नागरिकांना रजिस्ट्रेशन व शेड्युल करण्यास तांत्रिक अडचणी येत असतील त्यांनी पॅनिक न होता थोडा वेळ प्रतीक्षा करावी, सदर पोर्टल नवीन असल्याने त्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात , येत्या आठवड्यात ही स्थिती पूर्ववत होऊन लसीकरण वेगाने सुरू होईल


मालेगाव शहरातील एकमेव विश्वसनीय न्यूज पोर्टल मालेगाव लाईव्ह ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा http:://tiny.cc/Jayu

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने