📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सावधान : माणसांनंतर आता प्राण्यांमध्येही करोना ची लक्षणे

हैदराबाद (विशेष प्रतिनिधि) हैदराबाद येतील नेहरू झूलॉजीकल पार्क मधील आठ  सिंहाना कोरोना ची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून माणसापाठोपाठ आता प्राण्यांमध्येही करोना च्या विषाणूचा शिरकाव झाल्याची वाईट बातमी आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की सेंटर फोर  सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी Centre for Cellular and Molecular Biology (CCMB) च्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवर सिंहांच्या rt-pcr टेस्टचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली, आणखी काही रिपोर्ट येत्या  काही दिवसात कळणार आहेत, 

24 तारखेला या प्राणिसंग्रहालयाच्या प्राण्यांवर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिंहाना  कोरडा खोकला, नाकातून पाणी येणे व भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसली, त्यांनी ताबडतोब प्राण्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधला त्यानंतर डॉक्टरांनी प्राण्यांचे स्वॅब घेतले, तपासणीनंतर या प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू असल्याचे आढळले या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली असून ज्या प्राणिसंग्रहालयात ही गोष्ट घडली आहे ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्राणिसंग्रहालयापैकी एक आहे, 

 सुमारे 40 एकर परिसरात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालय यांमध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी जीवजंतू आहेत, त्यामुळे कोरोना प्राणीमात्रांवर ही घातक ठरणार का ही भीती सर्वांना सतावतेय




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने