📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

*महाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू; राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली*


✅काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले. त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

📌 सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात काय म्हटलंय?

🚙राज्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरटीपीसीआर कोरोना चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक आहे. हा रिपोर्ट त्याने प्रवास करण्याच्या ४८ तासापूर्वीचा असायला हवा.

✅ज्या राज्यांना अतिसंवेदनशील घोषित केले आहेत तेथील प्रवाशांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे नियम लागू असतील.

🚚माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये चालक, क्लिनर या दोघांशिवाय इतरांना प्रवास करण्यावर बंदी आहे. जर माल वाहतूक इतर राज्यातून महाराष्ट्रात होत असेल तर त्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देणं बंधनकारक.

✅जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना कोविडची परिस्थिती पाहता त्या त्या भागात योग्य तो निर्णय घेणे आणि बंधन लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

✅दूधसंकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावरील निर्बंध या काळात शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे दूध विकण्यावर अत्यावश्यक सेवेत असल्याने दिलेल्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली आहे. घरपोच सेवा सुरू राहील.

🛬एअरपोर्ट, मालवाहतूक, औषधांचा पुरवठा आणि कोविड व्यवस्थापनात जे कोणी कर्मचारी असतील त्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्यावर सूट

🛑स्थानिक जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारे निर्बंध लादत असताना त्याची माहिती ४८ तासापूर्वी देणं बंधनकारक आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने