देवळा: ( कसमादे न्यूज नेटवर्क ) रामेश्वर ता देवळा येथील भाबळे वस्तीवरील इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रामेश्वर येथील भाबळे वस्तीवर राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीने (दि.१३ ) रोजी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून अद्याप मृत्यूचे कारण नेमके समजु शकले नाही . सदर
गळफास घेणाऱ्या तरुणीचे नाव पूजा रतन ढेपले (वय-१७ वर्ष ) असे असून देवळा पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शुक्रवारी( दि १४) रोजी सकाळी देवळा ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खंडेराव भवर व ए एस आय राठोड ,सोनवणे आदी करीत आहेत.