18 ते 44 वयोगटात व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल
लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये काही अडचणी येत होत्या. तसेच अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
मालेगाव शहरासह अनेक भागात अद्यापही लसीचा तुटवडा आहे, आणि अशाच पुन्हा शासनाने अशा प्रकारचे निर्णय घेणे कितपत उपयोगी ठरेल हे वेळ ठरवेल कारण अशा प्रकारचे निर्णयाने लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात झुंबड होण्याची शक्यता आहे तसेच वादविवाद मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे
साभार : हॅलो महाराष्ट्र