📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अन्नधान्याची साठवणूक करण्यासाठी चंदनपुरी ला दोन शासकीय गोदामे मंजूर

                                    दि. 03 एप्रिल,2021
नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील
 आठ शासकीय गोदामांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता 
                                                                     - छगन भुजबळ 
नाशिक जिल्ह्यात नवीन आठ गोदामे मंजूर झाल्याने जिल्ह्यातील 
साठवण क्षमता अधिक वाढणार..

नाशिक दि. 03 एप्रिल, 2021 (जिमाका वृत्तसेवा): 
नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक, मौजे चंदनपुरी ता. मालेगाव जि. नाशिक येथील शासकीय गोदाम बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात अन्न,धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांनी मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता . येवला , मौजे राजूरबाहूला ता . नाशिक ,  मौजे चंदनपुरी ता. मालेगाव  येथील नवीन गोदाम बांधकामांच्या ०८ अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याबाबतच दि. १५ डिसेंबर २०२० रोजी पत्रान्वये विनंती केली होती. त्यानुसार नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता.निफाड, नांदगाव ता.नांदगाव, अंगणगाव ता.येवला, मौजे राजूरबाहूला ता.नाशिक ( ०३ गोदाम ), मौजे चंदनपुरी ता.मालेगाव ( ०२ गोदाम ) येथील ०८ गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


नाशिक जिल्ह्यामध्ये अन्न, धान्याची साठवणूक करण्यासाठी अधिक आठ गोदामे मंजूर झाल्याने जिल्ह्यातील अन्न, धान्य साठविण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे खरेदी केलेले अन्न धान्य साठवणूक करण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेशन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अन्न, धान्याचा साठा निर्माण होऊन अन्न, धान्याची टंचाई देखील त्यामुळे निर्माण होणार नाही.
000000000

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने