📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महानगरपालिकेतर्फे कोविड हेल्पलाइन सुरू

मालेगाव ( जय योगेश पगारे ) मालेगावातील कोरोना चा वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या यामुळे शहरातील रुग्ण रुग्णांचे नातेवाईक व महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी महापालिकेतर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे
 दिवसेंदिवस वाढणारा करोना चा संसर्ग आणि त्यामुळे वाढणारे मृत्यूचे प्रमाण यामुळे मालेगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 यावर मात करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून रुग्ण व नातेवाईक यांच्या सेवेसाठी महापालिका प्रशासनातर्फे हेल्पलाईन व वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे या वेबसाईटवर रुग्णांचा आजची स्थिती रुग्णालयातील उपलब्ध असलेली बेडची संख्या ऑक्सिजन बेडची संख्या मधील बीडचे संख्या इत्यादी इत्यंभूत माहिती मिळणार असल्याचे कळले आहे.
 सदर हेल्पलाईन मध्ये दोन नंबर दिलेले आहेत 8956443068/ 8956443070
 या नंबर ला कॉल करून कुठल्या हॉस्पिटलमध्ये बॅड शिल्लक आहे याबाबत मदत केली जाणार आहे यामुळे रुग्णांचे होणारे हाल कमी होण्यास मदत मिळणार आहे
 या शिवाय वेबसाईट च्या सहाय्याने कॉल न करताही उपलब्ध असलेली बेड संख्या वेबसाईट वर बघता येणार आहे 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने