अंबेजोगाई (विशेष प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे ही दुर्दैवी घटना घडली, मृतदेहांच्या अंतिम संस्कारासाठी नेण्यासाठी वाहनांची कमतरता असल्याने हा प्रकार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय मेडिकल कॉलेजच्या शवागारातून अंतिम संस्कारासाठी हे मृतदेह घेऊन जात होते, परंतु वाहतुकीच्या साधनांअभावी एकाच अंबूलस मध्ये सर्व 22 मृतदेह कोंबण्यात आले, आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असताना नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची तसेच मृतांची संख्या वाढतच आहे, अशा परिस्थितीत सोयीसुविधा व वैद्यकीय साधनांची कमतरता तसेच व्यवस्थेचा हलगर्जीपणा या गोष्टीस कारणीभूत आहे