नाशिक, दि.24 मार्च 2021 (मालेगाव लाईव्ह):
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मिती करिता आवश्यक सायलेज बेलर मशीन युनिटसाठी 50 टक्के केंद्र हिस्सा निधीतून रूपये 10 लाख रकमेची योजना जाहिर करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील दुध उत्पादक संघ अथवा संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी अथवा संस्था, स्वयंसहायता बचतगट, गोशाळा, पांजरपोळ, संरक्षण संस्था त्वरीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी आर नरवाडे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, या योजनेतून सायलेज बेलर, हेवीड्युटी कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली, वजन काटा, हार्वेस्टर मशिन व शेड हे घटक असून जिल्ह्यासाठी एका सयंत्राचे लक्षांक देण्यात आले आहे. सदर योजना सर्वसाधारण योजनेतील असल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांना निधीचा लाभ देण्याच्या मार्गदर्शक सुचना आहेत.
या योजनेचा लाभ हा डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे. संस्थेला मुरघास निर्मितीस प्रोहत्सान देणे व संस्थेस नफा प्राप्त होणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रति युनिट रूपये 20 लाख खर्चापैकी रूपये 10 लाख संस्थेने भरावयाचे आहे, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी आर नरवाडे यांनी कळविले आहे.
0000000