आज दुसर्या आठवड्यातही शनिवार रविवार चा बंद पाळला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरात खूप गर्दी असल्याच्या तक्रारी आहेत. मी याबाबत श्री पिंगळे यांच्याशी बोललो आहे व गर्दी नियंत्रणासाठी योग्य कार्यवाही केली नाही तर बाजार समिती कोरोना जाईपर्यंत बंद करावी लागेल याची कल्पना त्यांना दिली आहे.
अधून मधून उघडल्या जाणाऱ्या दुकानांवर दंडाची कारवाई मनपाची पथके करीत आहेत.
फुड जॉइंट्स, मिठाई दुकाने या ठिकाणी केवळ आणि केवळ टेक-अवे ला परवानगी असून त्या ठिकाणी उभे राहून खाणे यास सक्त मनाई आहे. या बाबीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकावर निश्चित करण्यात आली आहे. अशा ठिकाणी गर्दी दिसून आल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
यापुढे आता दंडा सोबत अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना शासनाचे अधिसूचने प्रमाणे कोरोना जाईपर्यंत सील केल्या जातील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सूरज मांढरे
जिल्हाधिकारी नाशिक
