📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पूर्ण क्षमतेने सुरू असलेल्या आस्थापनांवर कारवाई, बियर बारसह पिज्जा सेंटरला 5 हजाराचा दंड



-


*प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन केल्यास आस्थापना सहा महिन्यांसाठी होणार सिल*

*: उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा*

*मालेगाव दि. 25:* शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन होत असल्याच्या वाढत्या तक्रारी व कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आज महसूल, पोलीस व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी थेट कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. नवीन बसस्थानकाजवळील चौकात विनामास्क्‍ फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर जाफर नगर परिसरातील ए-वन पिज्जा सेंटर व शिवाजी पुतळ्याजवळील सी-ओटू बियर बार वर प्रत्येकी रु. 5 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईसोबतच यापुढे नियमांचे उल्लघन केल्यास अशा आस्थापना सहा महिन्यांसाठी सिल करण्यात येतील अशी तंबीही देण्यात आली.

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस उपअधिक्षक लता दोंदे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, प्रवीण खैरनार यांच्यासह महसूल, पोलीस व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*0000*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने