: धान्य वितरण अधिकारी पी.बी.मोरे
मालेगाव, दि. 20 ( मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा):* मालेगाव शहर कार्यक्षेत्रातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांचे मोबाईल क्रमांक व आधारसिडींग हे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2021 पर्यंत करणे अनिवार्य असल्याचे प्रभारी धान्य वितरण अधिकारी पी. बी. मोरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येणेसाठी अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड व मोबाईल सिडींग करणे आवश्यक असून, या करीता आपल्या रास्तभाव दुकानांचे ई-पॉस मशीन मधील E-KYC व मोबाईल क्रमांक सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक व मोबाईल सिडींगचे काम 31 जानेवारी, 2021 पूर्वी करुन घेण्याचे आवाहन श्री.मोरे यांनी केले आहे.
जे लाभार्थी आपले आधारक्रमांकाची सिडींग करुन घेणार नाहीत अशा लाभार्थ्यांना 31 जानेवारी, 2021 चे पुढील महिन्यापासून आधारक्रमांकाची सिडींग होईपर्यंत धान्याचा लाभ दिला जाणार नसल्याचेही श्री.मोरे यांनी नमुद केले आहे. जे रास्तभाव दुकानदार लाभार्थ्यांचे आधारक्रमांक सिडींग करण्याच्या कामात टाळाटाळ करीत असतील अशा रास्तभाव दुकानदारांची तक्रार पी. बी. मोरे धान्यवितरण अधिकारी, मालेगाव शहर संपर्क (9764185855). श्री. आर. रामाघरे, पुरवठा निरिक्षण अधिकारी, नवापुरा संपर्क (9823900279). एस.एस.शिंदे, ईस्लामपुरा संपर्क (7620681029). संदिप बोरसे ओयोसिस कंपनीचे तालुका प्रतिनिधी संपर्क (9579955444) यांच्याकडे लाभार्थ्यांनी तक्रार नोंदवावी असे आवाहनही प्र.धान्य वितरण अधिकारी श्री. मोरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.