📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

4 जानेवारीपर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यातील शाळा बंद.

प्रतिनिधि- दिनेश पगारे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत 4 जानेवारीपर्यंत नाशिकमध्ये शाळा सुरू होणार नाहीत असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.    
जिल्ह्यात 4 जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार
पालकमंत्री छगन भुजबळाच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यात शाळा 4 जानेवारीपर्यंत बंद राहतील. जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध असल्याने हा निर्णय घेतला आहे. पालकांचा वाढता विरोध लक्षात घेता प्रशासन शाळा बंद ठेवणार आहेत. 19 नोव्हेंवरपासून पुन्हा रुग्ण वाढण्याचा वेग पाहता 2556 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. एकूणच जिल्ह्यात वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचे हिताचे आहेत असेही ते म्हणाले. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात फेरआढावा घेऊन निर्णय घेऊन पुन्हा त्यावर चर्चा केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने