📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

फळे,भाजीपाला, खादये पदार्थ,चहा टपरी, पानटपरी,केशकर्तनालय,चर्मकार इ. पथविक्रेत्यांसाठी - दुकानासह रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना सूक्ष्म कर्ज सुविधा

केंद्र शासन प्रस्तुत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत मालेगाव शहरातील पथविक्रेत्यासाठी
विशेष सुक्ष्म पत पुरवठा सुविधा देणेकरिता मालेगाव महानगरपालिकेच्या DAY-NULM विभागा मार्फत PM SVANidhi सुविधा व अंमलबजावणी मालेगाव शहरात राबविण्याची नियोजन करण्यात आले. या योजनेत फळे,भाजीपाला, खादये पदार्थ,चहा टपरी, पाणटपरी,केशकर्तनालय,चर्मकार इत्यादी पथविक्रेत्यांसाठी - दुकानासह रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या उपजिवेकेमध्ये कोव्हीड–१९ साथीच्या रोगामुळे परिणाम झाल्यामुळे त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व इतर फायनांस बँका मार्फत सुरू होत आहे. त्यानुसार छोटे व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक यांना राष्ट्रीयकृत बँके कडुन रूपये १०,०००/- पर्यंत खेळते भांडवल कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. नियमित परतफेड व डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हि नवीन संधी उपलब्ध होत आहे. संबंधितांनी विहित कालावधील कर्जाची परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान तीन महिन्याच्या अंतराने मिळणार असून शहरातील सुविधा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने मागणी अर्ज भरता येणार आहे. मालेगाव शहरातील नगरपथविक्रेते / फेरीवाले यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका मालेगाव मार्फ़त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने