दिनेश पगारे (30जुलै)-आज मिशन झिरो अंतर्गत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ व माजी खा. समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळागाव राजवाडा इथे कोविड-19 चेकअप कॅम्प घेण्यात आला त्या प्रसंगी परिसरातील नागरिकांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या जवळपास शंभर लोकांचा स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली, आनंदाची गोष्ट की आज एकही पॉझिटिव्ह सापडला नाही..
कॅम्प च आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्य नाशिक च्या वतीने आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे ,आसिफ शेख ,डॉ संदीप चव्हाण, शरीफ शेख ॲड अजिंक्य गीते ,विनोद येवलेकर,ॲड महेश गायकवाड संदीप चावला, नीलेश साळवे ,यश खरात, संजय साळवे ,अमोल पवार ,महेश साळवे, ललित साळवे चंद्रकांत पगारे आदमी परिश्रम घेतले व परिसरातील लोक उपस्थित होते .कोविड कॅम्पचे आयोजन मध्य विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जय कोतवाल यांनी केलं होते.
