मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठित पाचगाव सोसायटी — दसाने, खडकी, सायने, मानके, दहीकुटे आणि परिसरातील सर्वात मोठी वि.का. सेवा सहकारी संस्था — दसाने येथे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते मा. डॉ .अद्वय आबा हिरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत *श्रीमती लक्ष्मीबाई संभाजी निकम (मानके)* यांची चेअरमनपदी, तर *श्री. प्रदीप मोरे (खडकी)* यांची व्हाइस चेअरमनपदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सोसायटीचे संचालक जिभाऊ पवार, राहुल पवार, विश्वास जाधव, ज्ञानेश्वर वैद्य, पांडुरंग गुंजाळ तसेच सौ. वेदिका हितेश पवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
