📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मनपा किमान वेतनावर स्थानिक १५०० कर्मचारी भरती करून कचरा संकलन ठेका रद्द करण्यात यावा, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितितर्फे धरणे आंदोलन; उपायुक्त शिंदे यांना निवेदन

सीटू संघटनेचे कामगार नेते रमेश जगताप यांनी कर्मचारींच्या समस्या मांडल्या सध्यास्थितीत कर्माचारींना मात्र ८००० रुपये वेतन मिळत असून कपात करुन फक्त ४५०० रुपये हातात येत असून तेव्हढयावर उपजीविका कशी भागविनार ? त्यांना किमान वेतनावर मनपा मध्ये भरती करून घेण्याच्या ह्या आंदोलनात सीटू संघटना पूर्ण ताकतीने आम्ही मालेगावकर समिती सोबत खांद्याला खांदा लावून उभी राहिल अशी ग्वाही यावेळी दिली. तसेच आनंद आव्हाड यांनी खाजगी विज कंपनी व मानपातील खाजगी ठेक्यांमुळे संविधानाने दिलेला अधिकाराचा भंग होत असून हे खजागीकरण बंद करावे, गुलामगिरी बंद करावी यासाठी सर्वांनी पेटून उठावे असे आव्हान केले.

 हिंदू मुस्लिम एकता संघटना व मोमीन कॉन्फरन्सचे अध्यक्ष जमील क्रांती यांनी मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना कामगारांच्या हितासाठी काम करतील, खांद्याला खांदा लावून लढा उभारतील फक्त कामगारांनी या अन्याया विरोधात एकजुटीने लढले पाहिजे असे आव्हान केले.

कैलास तिसगे यांनी लोकप्रिय पालकमंत्र्यांनी या कामगारांना किमान वेतनावर महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी आदेश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

कचरा कुंडी घोटाळा,बेंच खरेदी घोटाळा काढणे,आंदोलन करुन जिजामाता उद्यान , शिवतीर्थ सुशोभीकरण, गणेश कुंड येथील पादचारी पुल, सिनेमैक्स रोड, सोमवार बाजार व्यापारी संकुल आदी विषयावर आंदोलन करुन ते विषय ताडिस नेले म्हणून समाज कंटक ही उपमा आम्हास मिळत असेल तर आम्ही ती उपमा स्वीकारयाला तयार असल्याची समाज कंटक ह्या शब्दाला खोचक उत्तर देवा पाटील यांनी यावेळी दिल.

         ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधुन मालेगाव शहरातील भूमिपुत्र कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी नव्या क्रांतीला सुरुवात करत आहोत. हे आंदोलन कर्मचारयांना न्याय मिळत नाही तो पर्यंत चालूच ठेवू. जनतेत जावून खाजगी वीज वितरण कंपनी असेल, कचरा संकलन ठेका असेल मनपा मधील विविध भ्रष्टाचाराचे विषय असतील याबत जनजागृती करु. असे आव्हान निखिल पवार यांनी केले इतक्यावरच न थांबता पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर सरळ सरळ आरोप करत म्हटले की, भ्रष्टाचारी ठेकेदाराला पाठबळ देत असून कामगारांना न्याय मिळवून देण्यात पालकमंत्री स्वारस्य दाखवत नाही अन्यथा आज आंदोलनाची वेळच आली नसती. समाज हिताचे प्रश्न उचलत असताना माझ्यावर किती आरोप करा, हल्ले करा तरी मी कोणत्याही दबावाला बळी न पडता शहराच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. माझी जडण घडण ही माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक भिकन जिभाऊंच्या तालमीत झाली असून त्यांच्याकडून मिळालेले बाळकडू मला कोणालाही घाबरण्याची अनुमती देत नसून माझ्या संघटना व मित्रपरिवार फोडण्याचा प्रयत्न, घरावर हल्ला झाला तरी मी नडगमगता लढत आहे. पण स्वतःला राजकीय व्यवस्थेतील विरोधक म्हणून घेणाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या विषयावर व जनतेच्या प्रश्नावर शांत बसून या लढाईतून कढ़ता पाय घेतला आहे. जरी आम्हाला कोणाची साथ मिळाली नाही तरी मी प्रामाणिक व सच्चा कार्यकर्त्यांच्या जीवावर शेवट पर्यंत भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध लढत राहणार असल्याचे ते बोलले. कामगारांच्या व्यथा मांडत असताना ते भावनिक झाले होते. ते कामगारांच्या प्रश्नावर तितकेच आक्रमक बघायला मिळाले.

आंदोलनात निखिल पवार, रमेश जगताप, देवा पाटील भरत पाटील जमील क्रांती, सुशांत कुलकर्णी, कैलास तिसगे, आनंद आव्हाड, अझर खान, राजेंद्र पाटील, मोहन कांबळे, दीपक अहिरे, राकेश शिंदे, आनंद निकम, संकेत खरात, सागर निकम, प्रदीप पवार, संतोष शिंदे, सिद्धार्थ मगरे, सुशील उशिरे, मिलिन आहिरे, विशाल जाधव, बापू निकम, मनोज वाघ, तात्या खरे, आनंद जोगदडे, एकनाथ शिंदे, अरविंद महाले, रुपेश बालीद, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, व शेकडो महिला पुरुष आंदोलनात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने