📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे साजरा

( मालेगाव ) येथील जे ए टी आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये इंग्रजी विभागातर्फे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी *फ्रेशर्स डे* चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सलमा अब्दुल सत्तार ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे आय क्यू ए सी कॉर्डिनेटर प्रा. मुनव्वर अहमद, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ लोधी कनीझ फातेमा ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयात वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रेनबो या थीम अंतर्गत वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धां बाबत माहिती दिली. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी महाविद्यालयात असलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती दिली आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. इंग्रजी विभागातर्फे उपस्थित सर्व विद्यार्थिनीचे स्वागत गुलाब पुष्प आणि डायरी देऊन करण्यात आले. याप्रसंगी इंग्रजी विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले. तृतीय वर्ष कला शाखेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार विभागातर्फे करण्यात आला. कु उम्मे अम्मारा (प्रथम क्रमांक ८८.३३%), कु सादेका सदफ ( द्वितीय क्रमांक ८८.२९%) कु. सबाहत्तुनिसा ( तृतीय क्रमांक ८८.१३) या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सारा अन्सारी हिने केले कार्यक्रमाला प्रा नाझनीन यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.सारा, कु. आफिया कौसर , कु. सादेका, कु सफिना, , कु लुबना, या विद्यार्थिनींनी अत्यंत परिश्रम घेतले. कु आफिया हिने उपस्थितांचे आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने