📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मेरा पहला वोट ,देश के नाम' जे ए टी राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

0
शिक्षण मंत्रालयाच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार 28 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2024 या कालावधीत “मेरा पहला वोट देश के लिए” मोहीम सुरू केली आहे. निवडणूक साक्षरता प्रचारासाठी MoE ने भारतीय निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विविध उपक्रमांची रचना केली आहे. तरुणांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करण्यासाठी या परिपत्रकानुसार जे ए टी महाविद्यालयातील इलेक्टोरल लिटरसी क्लब आणि राज्यशास्त्र विभागाने सदर कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. 28 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली व ऑनलाइन मिळालेल्या प्रमाणपत्राची प्रत महाविद्यालयात जमा केली. दिनांक 29 फेब्रुवारी रोजी डॉ.सलमा ए.एस (शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक) यांनी येत्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या नव मतदारांना मतदानाच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले.2 मार्च रोजी विद्यार्थीनींनी निवडणूक साक्षरतेबाबत पोस्टर तयार केले.. ३ मार्च ते ६ मार्च २०२४ या कालावधीत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या छायाचित्रासाठी सेल्फी पॉइंट सेट केला होता. 6 मार्च 2024 रोजी *मेरा पहला वोट देश के लिए* या विषयावर विद्यार्थ्यांचा सेमिनार आयोजित केला होता. त्याच दिवशी प्रा. मेश्रामकर सुनेत्रा (इंग्रजी विभाग प्रमुख) , डॉ. लोधी कनिझ फातमा, ( राज्यशास्त्र विभागप्रमुख) आणि डॉ. ताहेरा तस्नीम (अर्थशास्त्रविभागप्रमुख) यांनी विद्यार्थिनींना सरकार स्थापनेसाठी मतदारांचे महत्त्व याविषयी व्हिडिओ संदेश दिला. याच महिन्यात राज्यशास्त्र विभागाने EVM/VV PAT मशीन मोहिमेवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती आणि उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते ज्यांनी EVM मशीनचा डेमो दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मो. हारून मो. रमजान यांच्या देखरेखीखाली सर्व उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाले. माननीय अन्सारी अनीस अहमद साहेब (अध्यक्ष जेएटी व्यवस्थापन) माननीय निहाल अहमद साहेब (मा. सचिव जेएटी व्यवस्थापन) माननीय एडवोकेट नियाज लोधी साहेब (कोषाध्यक्ष जेएटी व्यवस्थापन) यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महाविद्यालयातील सुमारे 500 विद्यार्थिनींना या उपक्रमाचा लाभ झाला.

 महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
 महिला सुरक्षा आणि विकास समिती, इंग्रजी विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते . प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार या होत्या. महिला सुरक्षा आणि विकास समिती यांच्या समन्वयक प्रा सुनेत्रा मेश्रामकर यांनी प्रास्ताविक केले. महिला दिनाचा इतिहास, तो साजरा करण्या मागची पार्श्वभूमी याबाबत विद्यार्थिनींना विस्तृत माहिती दिली. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी महिला सक्षमीकरणाबाबत विद्यार्थिनींना सांगितले आणि विद्यार्थिनींना 'निर्भय बना' असा संदेश दिला. डॉ फरजाना यांनी महिलांसाठी, मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला जावा असे आवाहन केले. याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लोधी कनीझ फातिमा यांच्यासह महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी तृतीय वर्ष कला शाखेच्या सबाहत्तुनिसा, नसिमुस्सहर आणि सादेका या विद्यार्थिनींनी आपले विचार प्रगट केले. प्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)