📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देसले यांचे लिखाण काळजाचा ठाव घेणारे - डॉ. दिलीप धोंडगे

'जगणं समजून घेताना ' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

मालेगाव - माणूस हाच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. जगातील सगळ्या साहित्याचा विषय हा माणूस अन् माणसाचं जगणं असतो. कवी कमलाकर देसले यांच्या ' जगणं समजून घेताना ' या पुस्तकातून त्यांनी विविधअंगाने माणसाचे जगणं समजून घेतले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारे असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचा अभ्यासक प्रा.डॉ.दिलीप धोंडगे यांनी केले. 
            येथील हॅपी हॉल येथे कवी कमलाकर देसले यांच्या पहिल्या स्मृती दिना निमित्त शब्दरत्न प्रकाशनतर्फे रविवारी ( दि.४) देसले यांच्या ' जगणं समजून घेताना...' या ललित लेख पुस्तकाचे प्रकाशन डॉ.धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.के.एन.अहिरे, साहित्यिक लेखक मनोहर विभांडीक, प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर, मवीप्र संचालक ऍड. आर.के. बच्छाव उपस्थित होते. 
            डॉ.धोंडगे बोलतांना म्हणाले की, देसले यांचे व्यक्तिमत्व निर्मळ होते. जीवनाचा गंभीरपणे विचार करून त्यांनी साहित्याची अतिशय दर्जेदार निर्मिती केली. जगणं समजून घेताना या पुस्तकातून गद्य आणि पद्य याचा संगम असल्याने ते लेखक व कवी म्हणून पुस्तकातून भेटतात. 
त्यांच्या लेखनातून ते थेट आपल्याशी संवाद साधतात याचा प्रत्यय येतो. पुस्तकात त्यांनी छोटे छोटे विषय घेऊन मानवी जीवनाची उकल केली आहे.महानुभाव साहित्यातील दृष्टांत आणि दृष्टांतिक पद्धत त्यांनी वापरली आहे. पुस्तकातील कविता स्वतंत्र वाटतात. त्यामुळे हे पुस्तक उत्तम काव्यानुभव देते. पुस्तकातील लेखांच्या केंद्रस्थानी माणसाचे जगणं असल्याचे सांगत डॉ. धोंडगे यांनी त्यांच्या विवेचनात अतिशय ओघवत्या शैलीतून पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगितले.
        प्रमुख अतिथी डॉ. गोरवाडकर यांनी पुस्तकातील लेख जगण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून त्यातील लेखन शैली ही वाचकांना आपलेसे करते. प्रा.के.एन.अहिरे यांनी ग्रामीण साहित्य चळवळीची झालेली रुजवण त्यातून घडत गेलेले लेखक, साहित्यिक याविषयी विचार मांडताना देसले यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर मनोहर विभांडीक यांनी 'जगणं समजून घेताना ' पुस्तकातून देसले यांच्या पुनर्भेटीचा प्रत्यय येतो. देसले यांच्या शब्दातून त्यांच्या स्पर्शाची अनुभूती येते. त्यांचे लेखन काळजाला फिडणारे असते. सध्याचं सामाजिक वातावरण हे कोलाहलचे आहे. अशा वातावरणात आपल्याला ' आनंदी जगण्याचे सिक्रेट ' जाणून घ्यायचे आहे. ते सिक्रेट या पुस्तकातून उलगडणार असल्याचे म्हटले. 
        कार्यक्रमात ओम देसले, स्वाती देसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व आभार प्रदर्शन तुषार देसले यांनी केले. सूत्रसंचालक अभय दीक्षित यांनी केले. कार्यक्रम यशस्वतेसाठी ह.भ.प. प्रकाश गांगुर्डे, किशोर जाधव,गोकुळ शिनकर, ,प्रतिभा साळुंके, किरण दशमुखे, चित्रा देसले, मानसी देसले, सुधीर देसले, दिलीप देसले, पुष्कर पवार, जयेश वारुळे, कुंदन ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
        यावेळी सोहळ्यास नरेंद्र खैरनार, एल. जी. आबा, विजय पाटील,जनार्दन देवरे, डॉ एस.के.पाटील, सुरेंद्र टिपरे, भीला महाजन, सतीश कलंत्री, रविराज सोनार, राजेंद्र दिघे , सुनील वडगे, प्रवीण कुलकर्णी, डॉ.मिलिंद परिपत्यदार, डॉ.सुरेश शास्त्री, डॉ. रवींद्र वाडेकर, डॉ.पियूष अहिरे, डॉ.दिलीप भावसार, डॉ.सी.एम.निकम, आर. डी.निकम, अरुण पाटील, डॉ.उज्वला देवरे, डॉ.सयाजी पगार, दिनेश पवार, निखिल पवार, शेखर पगार, भरत पाटील, योगेश बच्छाव, चेतन देशमुख, निवृत्ती गायकवाड, मंगेश सुर्यवंशी, विजय पोफळे, मुकुंद थोरात, मधु भांडारकर,डॉ.विनायक इंगळे, डी.बी.देशमुख, विजय देसाई, अतुल देसाई, योगेश पवार, संदीप देसले, नासिर पठाण, शेखर इंगळे, योगेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने