राकेश आहेर:- (देवळा)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने देशभरात सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर देवळा येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित दौऱ्यावर असतांना भाजपा अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष सोपन सोनवणे यांच्या वतीने देवळा व तालुक्यातील लोहोणेर गावांसाठी आदिवासी विकास कामे निधी मिळणे बाबत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की देवळा तालुक्यातील गावांतील आदिवासी वस्तीमध्ये प्रलंबित आहेत त्यात लोहणेर गटातील अंडर ग्राउंड गटार ,सभामंडप ,आदिवासी वस्ती काँक्रीटीकरण तसेच वासोळ निंबोळा रस्त्याचे डांबरीकरण करणे लोहोणेर गावातील सार्वजनिक शौचालय , स्मशानभूमीस वाल कंपाउंड व वासोळ खालप रोड येथे असलेल्या आदिवासी वस्तीवर सौरदीप तसेच खामखेडा फांगदर वस्ती सभामंडप व देवपूर पाडे येथील प्रस्तावित आदिवासी आश्रम शाळेचे प्रस्तावित कामात निधी उपलब्ध करून द्यावा तसेच देवपूरपाडे सभामंडप आदिवासी सांस्कृतिक भवन तयार करणे बाबत अश्या विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी देवपूर पाडे येथील आश्रम शाळेच्या प्रस्तावित कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे.
यावेळी चांदवड - देवळा विधान सभेचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण अनुसूचित जमातीचे तालुकाध्यक्ष सोपान सोनवणे, वैभव पवार, लखन वाघ, शिवा वाघ, महेंद्र बोरसे, दिपक मोरे विलास सोनवणे, लखन सोनवणे, दिपक गायकवाड दिशांत देवरे हर्षल मोरे दिनेश मोरे आदी उपस्थित होते.