दिंडोरी तालुक्यासह शहर परिसरात भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले आहेत 8.58 वाजता भुकंपाचा पहिला सौम्य धक्का बसला आहे.
मंगळवार रोजी 8:58 पासून 9:30 वाजेपर्यंत जाणवला आहे हे भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
हे तीनही धक्के सुमारे तीन ते सहा रिश्टर स्केल
चे होते ; परंतु नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे कारण नसल्याचे तसेच अफवा पसरवू नये असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ - प्रा.किरणकुमार जोहरे यांनी केले आहे
भूकंपाच्या धक्क्याने घरातील भांडे जमिनीवर पडले आहेत, काही लोक बसल्या बसल्या फेकले गेले आहेत त्यामुळे दिंडोरी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जवळपास दिंडोरी तालुक्यातील 80 टक्के गावांना हा धक्का बसल्याचे अंदाज वर्तविला जात आहे. काही ठिकाणी तर तीन वेळा धक्का जाणवला आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ - प्रा.किरणकुमार जोहारे यांनी दिली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी, अफवा पसरवू नये, तसेच अगदीच घाबरून जाऊ नये घरात रात्र जागून काढण्याची गरज नाही बाहेर मोकळ्या जागेत किंवा छतावर, सोय असल्यास तेथे झोपावे, जीर्ण झालेल्या व मोडकळी झालेल्या भिंती जवळ किंवा घरात झोपू नये, जमिनीच्या अंतर्भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकंपाचे झटके जाणवत असतात, त्याचा आणि पावसाचा काही संबंध नाही त्यामुळे नागरिकांनी पावसामुळे या घटना घडत असतील असेही मानू नये तसेच मोठा भूकंप होण्यापेक्षा छोट्या छोट्या प्रमाणात होणाऱ्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा तसेच जीवितहानीचा धोका टळतो असेही प्रा. जोहरे यावेळी म्हणाले
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक