📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगाव महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू

 मालेगाव महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम पूर्ण सुरू करण्यात आलेली असून आज पथक क्रमांक ०३ व ०४  कडून प्रभाग कार्यालय क्रमांक ०३ चे कार्यक्षेत्रातील  येथील मुमताज चौक ते जाफर नगर रस्ता ते मिल्लत मदरसा रस्त्या च्या दोन्ही बाजूवरील ८७ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आलेले आहे.
यावेळी प्रभाग अधिकारी हरिष डिम्बर, प्रथक क्रमांक ०३ व ०४ चे पथक प्रमुख संकीर्ण कर अधीक्षक सुनील खैरनार, लिपिक संतोष गायकवाड, विनय शिंदे तसेच बीट मुकादम मनोहर ढिवरे,  अजय चांगरे, संजय जगताप, राजू वाघ, प्रवीण महाले, अब्दुल वाहीद, विशाल जेदे, सचिन त्रिमुखे, वाहन चालक आमीर अन्सारी व अतिक्रमण गस्ती पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
सदरची मोहिम आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतिश दिघे, सहा.आयुक्त सुनिल खडके यांचे मार्गदर्शन खाली अतिक्रमण  राबविण्यात येत असल्याने अतिक्रमणधारकांना पुन्हा सुचित करण्यात येते की, त्यांनी आपले रस्ता, नाला, गटारी वरील अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा मनपा  पथकाकडून त्यांचे अतिक्रमीत साहित्य जप्त करण्यात येईल तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस अडथळा आणणाऱ्या इसमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्रकार द्वारे कळविण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने