📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” उपक्रमाबाबत बैठक संपन्न


मालेगाव मनपा वृत्तसेवा: भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म.शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येक घर व इमारतींवर भारतीय स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज स्वत: विकत घेवून राष्ट्रध्वज उभारणेसाठी दि. ११ ऑगस्ट, २०२२ ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत प्रत्येकाने  “हर घर हर झेंडा”  उपक्रम राबविण्यात येत आहे.

याकामी आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांचे मार्गदर्शनाने आज दिनांक १४/०७/२०२२ रोजी मनपाच्या महासभागृहात दुपारी १२.३० वा. मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात “हर घर तिरंगा” उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय, निमशासकीय,खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांची बैठक आयोजित करण्यांत आलेली होती. सदर बैठकीत सर्व खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, अशासकीय संस्था यांनी त्यांचे स्तरावर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत चर्चासत्र, स्पर्धा, शिबीरे घेवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी आणि सामान्य नागरीक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करुन “हर घर तिरंगा” उपक्रमाच्या यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपायुक्त सुहास जगताप यांनी केले.

 समाजातील सर्व घटकांनी “हर घर तिरंगा” उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहितेचे पालन करणे गरजेचे आहे. दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये उपक्रम राबवितांना तिरंगा ध्वज खराब झाल्यास मनपाचे प्रभाग समिती कार्यालय क्रं.१, २, ३ व ४ येथे सन्मानाने परत करावा. उक्त कालवधीमध्ये सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येक घर व इमारतीवर तिरंगा ध्वज उभारण्यांत यावा. राष्ट्रीय ध्वज प्राप्त करणेसाठी खरेदीदार यांनी स्थानिक मक्तेदार तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून कळविण्यात आलेले 

१) कबीर कुमार-मो.नं.७०९१४७२५५५, ८८००२६५७७९ ई-मेल aniratcontracts@gmail.com मुंबईतील पुरवठादार 

२) पुष्कर नाईक मो.नं. ८८००४८८०३०, ९८५९५८८३२५ 

या तिरंगा पुरवठाराशी संपर्क साधुन नियोजन करावे. त्यानुसार तिरंगा ध्वज हा निशुल्क राहणार नाही, प्रत्येक नागरिकाने हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क/खादी पासुन बनविलेल्या कापडाचे २ फुट बाय ३ फुट चा आकाराचा ध्वज स्वेच्छेने विकत घेण्याचे करावे. तसेच मालेगाव शहरातील स्वातंत्र सैनिकांचा परिचय शालेय विद्यार्थ्यांना होणेबाबत सर्व शाळा, महाविद्यालय यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन उपायुक्त सुहास जगताप यांनी केले आहे.

सदर बैठकीस उपायुक्त सुहास जगताप, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी जगदिश बडगुजर, शाम बुरकूल, हरिश डिंबर व अ.कदिर अ.लतीफ यांचे सह सुनिल दुसाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी, मालेगाव, अनिल सरोदे, समग्र शिक्षा अभियान, मनपा, प्रा.विलास खैरनार, प्रसाद पेठकर संचालक विद्या विकास इंटरनॅशनल स्कुल,शोभा भावसार मुख्यसेविका, ICDS,  लता दिपक जाधव, सुपरवायजर ICDS, गजाला परविन मोहम्मद आमिन, पॅराडाईज हायस्कुल, अन्सारी सायमा तबसुम ऐजाज अह.,हाज्जीन कमरुन्निसा प्रायमरी स्कुल,एन.एम.मांडवडे, एल.व्ही.एच.विद्यालय, मा.कॅम्प, ऐहताशाम मो.जमील, एम.डी.एफ तसेच शहरातील इतर सन्माननीय नागरीक उपस्थित होते.
                                                          
                                                      

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने