📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दहीवड ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष

दहीवड ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केलायरामनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असून या दूषित पाण्यामुळे येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे तसेच या टाकीचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेनागरिकांनी रामनगर येथील पाण्याच्या टाकीत उतरून टाकीत असलेला गाळ बाहेर काढला, यावेळी विक्रम अहिरराव, युवराज पानसरे, जगन्नाथ बच्छाव, केदा पानसरे, समाधान पानसरे, आदींनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता सदरील टाकीत गाळ, अळी जीव , जंतू आढळून आले.  पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता केली जात नसल्याने आजारांना निमंत्रण मिळत आहे  वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ व प्रहार शेतकरी संघटनेच्या संजय दहिवडकर यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने