📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सुप्रसिद्ध कवी, गझलकार, ललित लेखक, कमलाकर देसले उर्फ आबा यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

मालेगाव (मनोहर शेवाळे)

- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कमलाकर ( आबा ) देसले यांचे निधन...
- हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन
- नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील होते कवी कमलाकर देसले..
- ज्ञानापिठ, प्रेमाचा झरा , एक वात्सल्यसिंधू, कवी , साहित्यिक , गझलकार , आदर्श शिक्षक, एक वारकरी, ज्ञानोबा तुकोबांचे पाईक अशा अनेक उपाधी मिळवलेले..
- चालतं - बोलतं ज्ञानपीठ होते कवी कमलाकर देसले..
- आबांच्या जाण्याने कला व साहित्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी..
- नाशिकच्या साहित्य क्षेत्रातिल एक अनमोल हिरा हरपला..

महाराष्ट्रातील सुविख्यात जेष्ठ कवी, गझलकार, ललित लेखक, कमलाकर देसले ( वय - ५९ ) उर्फ आबा यांचे काल रात्री हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.सायंकाळी अचानक छातीत त्रास झाल्यामुळे त्यांना मालेगावच्या सटाणा रोडवरील संकल्प हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचार सुरु असतांनाच त्यांच्या निधनाची बातमी आली.आबांच्या निधनाने कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे..ज्ञानापिठ, प्रेमाचा झरा , एक वात्सल्यसिंधू, कवी , साहित्यिक , गझलकार , आदर्श शिक्षक, एक वारकरी, ज्ञानोबा तुकोबांचे पाईक अशा अनेक उपाधी मिळवलेले चालतं बोलतं ज्ञानपीठ होते कवी कमलाकर देसले..स्वर्गीय आबांना महाराष्ट्रातील सर्वच लेखक, साहित्यिक, कलावंतांनी श्रद्धांजली वाहतांना ' दु:खद गझलेतील परिपक्व जाण हरवली ' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने