📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सहाय्यक पोलिस निरीक्षकास एक लाखाची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षकाला एक लाखाची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जगन्नाथ ढिकले वय 32 वर्षे रा. जिजाई नगर , तिरपुळे रोड मेहुणबारे  यांनी तक्रारदारास गुन्ह्यामध्ये मदत करून दोषारोप पत्र लवकरात लवकर चार्जशीट सादर करण्याच्या मोबदल्यात चार लाख पन्नास हजाराची मागणी केली होती तडजोडीत एक लाख रुपये देण्याचे ठरले होते ती रक्कम आज दिनांक 02/06/2022रोजी दुपारी दोन अडीच वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक गणेश ढिकले यास लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे 28 वर्षीय तक्रारदार याच्या विरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0071/2022 भादवी कलम 115, 118व 120 ब प्रमाणे 29/03/2022रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर दाखल करण्यासाठी व सदर गुन्ह्यात तक्रारदाराने पोलीस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश ढिकले याने 02/06/2022 एक लाख रुपये देण्यावर तडजोड झाल्याने तक्रारदार याने तक्रार नोंदविल्यानतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून दुपारच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडल्यानंतर गणेश ढिकले याच्या मुसक्या आवळण्यात आल्या व गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन एन जाधव, ए एस आय दिनेशसिंग पाटील, ए एस आय सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलिस कर्मचारी शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस नाईक जनार्दन चौधरी, पोलीस नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल नासीर देशमुख,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने