📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आर बी एच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लसीकरणांसाठी विद्यार्थिनींचा उत्साह

मालेगाव (किरण बागुल) आर बी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रमिला पाटील याच्या मार्गदर्शनाखाली आणि सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत 04 जानेवारी, मंगळवार रोजी इयत्ता 9 वी ते 12 वीच्या 15 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थिनींना कोविड19 च्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. 
          शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये आर बी एच कन्या विद्यालयात आरोग्य विभाग, महानगर पालिका, मालेगाव यांच्या सहकार्याने 9 वी ते 12 वी च्या 15 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थिनींना लसीकरण करण्यात आले असून संपूर्ण शालेय परिसर व शाळा सॅनेटाइझ करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनींचे थर्मल स्कॅनिंग, साबणाने हात धुणे, विद्यार्थिनींना शारिरीक अंतर ठेवून प्रवेश, कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लसीकरण करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी लसीकरणासाठी लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन आले होते. यावेळेस इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थिनींनमध्ये उत्साह दिसला आणि तसेच विद्यार्थिनींची उपस्थिती चांगली होती.
          अश्याप्रकारे विद्यालयात इयत्ता 9 वी ते 12 वीच्या एकूण 500 विद्यार्थिनींना लस देण्यात आली असून लसीकरण खूप उत्साहाने झाले. तसेच लसीकरण चालू असताना आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी मा डॉ सपना ठाकरे यांनी विद्यालयाला भेट दिली. एका बेंच वर एक विद्यार्थिनी असे नियोजन करून लसीकरण करण्यात आले. विद्यार्थिनींना विद्यालयात लसीकरण केल्याने विद्यार्थिनींनी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला.
            विद्यालयातील प्राचार्या सौ प्रमिला पाटील, उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे व श्रीमती साळुंखे आर जे, पर्यवेक्षिका सौ शेवाळे पी एस, श्रीमती ठाकरे एल जे, सर्व शिक्षक बंधुभगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने