📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मनमाड-येवला रोडवर भीषण अपघात : अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

मनमाड विभाग(मालेगाव लाईव्ह न्युज नेटवर्क)
मनमाड येथुन जवळ असलेल्या अनकवाडे - अंकाई किल्ल्याजवळ मनमाड - येवला मार्गावर कारने मोटारसायकला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार शिवाजी पोपट पवार (वय ४८) हे ठार झाला असून मागे बसलेली त्याची पत्नी सुमनबाई शिवाजी पवार(वय ४३) या गंभीर जखमी झाली आहे 

*एरटिका कारने दिली जोरदार धडक*
                 मनमाड पासून जवळ असलेल्या नागापूर येथील रहिवाशी असलेले शिवाजी पोपट पवार (वय ४८) व त्यांच्या पत्नी सुमनबाई शिवाजी पवार (वय ४३) हे दोघे जण आज नातेवाईकाला भेटण्यासाठी शिर्डीकडे जात होते. मनमाड येवला मार्गावर अनकवाडे शिवारात  अंकाई किल्ल्याजवळ रस्त्यावर मोटारसायकलवर जात असतांना समोरून येणाऱ्या एरटीका कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शिवाजी पवार हे ठार झाले आहे अपघात इतका जोरात झाला होता की मागे बसलेली त्यांची पत्नी बाजूला फेकली जाऊन त्याही गंभीर जखमी झाल्या आहेत या दोघांनाही मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर दोघेही गंभीर जखमी असल्याने दोघांनाही मनमाड येथून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले मात्र रस्त्याने जात असतांना मध्येच शिवाजी पवार यांची प्राणज्योत मावळली. त्याच्या जखमी पत्नीवर उपचार सुरु आहे. नागापूर येथील या महिन्यातील ही तीसरी घटना आहे वेगवेगळ्या घटनेत  तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे मयत शिवाजी पवार यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, आई, वडील असा परिवार आह.आज सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने