📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सिन्नर येथे अवैध बायोडिझेल विक्री पंपावर छापा, नाशिक ग्रामिण चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनची कारवाई


मालेगाव लाईव्ह न्युज नेटवर्क :- 
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी मा.पोलीस अधिक्षक श्री. सचिन पाटील यांची विविध अवैध धंदयांवर कारवाई सुरू आहे. पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण श्री. सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीची माहिती मा. पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक / दशरथ चौधरी, एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन यांना सांगुन त्यांना कार्यवाही करणेबाबत सांगितल्याने पोलीस निरीक्षक श्री दशरथ चौधरी यांनी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मा. पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे मार्गदर्शन करून दिनांक २२/११/२०२१ रोजी एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन हददीतील एम. आय. डी. सी परीसरात सापळा लावला असता एक टँकर क्रमांक एमएच १५ एफव्ही ९९१० हा संशयास्पदरित्या कंपनीतुन बाहेर पडतांना दिसला असता एमआयडीसी सिन्नर पोलीसांनी पाठलाग करून टँकरला पकडुन त्याची तपासणी करता त्यात डिझेल सदृक्ष स्फोटक द्रव्य दिसुन आल्याने पोलीसांनी चालकाची कसून चौकशी करता चालकाने दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी तात्काळ ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनी मुसळगाव एम. आय. डी. सी यावर छापा टाकला असता तेथे रक्कम रुपये २५,९९,०००/ रूपये किंमतीचा माल टँकरमध्ये एकुण ३३,५०० लिटर डिझेल सक्ष स्फोटक द्रव्याचा साठा आढळून आला. कंपनीचे मालक रमेश किसन कानडे व इतरांकडे सदर मालाची चौकशी करता त्यांचेकडे फरनीस ऑईलचा परवाना असल्याने फरनीस ऑईल चे बील तयार करून त्या फरनीस ऑईल ऐवजी डिझेल सदृक्ष द्रव्य सप्लाय करतांना व साठा बाळगतांना मिळून आले. तसेच त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

सदर कारवाईत १) रमेश किसनराव कानडे २) सुयोग रमेश कानडे ३) राजेंद्र बबन चव्हाण (४) अझर नुरमोहम्मद खान ५) अनिल महादु माळी या व्यक्तीनं विरोधात  अवैधरित्या जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ उल्लंघन ७ प्रमाणे स्फोटक अधिनियम द्रव्य पदार्थ १८८४ वे कलम ९ व (१) (ब) सह जिवनमापे कलम अंमलबजावणी अधिनियम कलम २५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन नमुद गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी हे करीत आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हयाचे मा.पोलीस अधिक्षक श्री. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणेकडील पथकातील पोनि चौधरी, सपोनि पवार, पोना मरसाळे, शिंदे, धुमाळ पोकॉ जाधव, सानप, निकम यांनी सदरची कामगिरी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने