दिंडोरी (जय योगेश पगारे) दि. 21, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन शिक्षकांचा मृत्यु झाला आहे, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत नाशिक ते कळवण रोडवर वरखेड फाट्याजवळ फॉर्च्यून कंपनी च्या समोर रस्त्यावर पावसाच्या सरीत अचानक पाच वाजेच्या सुमारास एक वाळलेले झाड एका चार चाकी इर्टिगा गाडी वर आदळल्याने त्या ठिकाणी गाडीतील इसमांपैकी तीन इसम जागीच मयत झाले
एम. एच. 15 एफ. एन. 0997 या पांढऱ्या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीवर वाळलेले झाड कोसळले. त्यात शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय 51, रा. किशोर सुर्यवंशी मार्ग दिंडोरीरोड, नाशिक), रामजी देवराम भोये (वय 49), नितीन सोमा तायडे (वय 32, रा. रासबिहारी लिंक रोड, नाशिक) हे जागीच ठार झाले. गाडीतील पुढील सीट वरील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. तीनही शिक्षक हे सुरगाणा तालुक्यातील शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगुन येथे शिक्षक असून रोज अप-डाऊन करतात
याबाबत अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दिंडोरी करत आहे