सोयगाव (जय योगेश पगारे) सोयगाव आरोग्य केंद्रात दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान एका मद्यपी इसमाने आरोग्य सेवकांची हुज्जत घालत वाद निर्माण केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दुपारच्या सुमारास सोयगाव येथील शहरी नागरी आरोग्य कोरोनासाठी लसीकरण सुरू होते, यादरम्यान एका मद्यपी इसमाने आरोग्य सेवकांशी लसीकरणाबाबत मुद्दाम हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला, यावेळी आरोग्यसेवकांनी समजूतदारपणा दाखवत सदर व्यक्तीला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला , परंतु सदर इसम त्यांच्याशी मुद्दाम हुज्जत घालत होता व लोकप्रतिनिधीची धमकी देत होता, सदर ठिकाणी आरोग्य केंद्र समोरील निमुळत्या जागेत नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी उपस्थित होते त्यामुळे सहाजिकच तेथे गर्दी दिसणे स्वाभाविक आहे यावरूनही सदर इसमाने पुन्हा आरोग्य सेवकांची हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला उपस्थित नागरिकांनीही सदर व्यक्तीला समज देण्याचा प्रयत्न केला परंतु ती व्यक्ती ऐकण्यास तयार होत नव्हती शेवटी आरोग्य सेवकांनी विनंती करीत सदर व्यक्तीस बाहेर काढले,
परंतु अशा घटनांमुळे आरोग्य सेवकांचे मानसिक खच्चीकरण होत मनोबल कमी असते, अत्यंत सहकार्याची भावना असून सुद्धा नागरिक जर अशा प्रकारे आरोग्य सेवकांची वाद घालत असतील तर आरोग्य सेवकांनी काय करावे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो.
या ठिकाणी दर वेळी सुमारे पाचशेच्या वर लाभार्थ्यांचे लसीकरण होत असते, याशिवाय पोलिओ लसीकरण हि सुरु आहे त्यामुळे आधीच कर्मचाऱ्यांवर ताण असताना लोकांचे असे वागणे कर्मचाऱ्यांचा वेळ तर वाया घालवतेच व इतर लाभार्थ्यांचे अशा प्रकारे वेळ वाया गेल्यामुळे नुकसान होते, या ठिकाणी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे, नागरिकांनी स्वतः लसीकरण संबंधात आपली माहिती आपल्याजवळ अद्ययावत ठेवावी जेणेकरून नागरिकांना तसेच आरोग्य सेवकांना सदर लसीकरण संदर्भात नोंदणी करणे सोपे जाईल व दोघांचाही वेळ वाचेल,
लसीकरण संदर्भात ऑनलाइन नोंदणी करताना जो मोबाईल नंबर रजिस्टर करतो तो मोबाईल नंबर लसीकरणाचे वेळेस सोबत नेणे गरजेचे असते लसीकरण संदर्भात जी संगणक प्रणाली/सॉफ्टवेर आहे त्यावर लोड असल्यामुळे बऱ्याचदा माहिती अद्ययावत करण्यास वेळ लागू शकतो अशावेळी नागरिकांनी संयम पाळणे ही तितकेच महत्त्वाचे असते, आपल्याला माहिती असल्यास किमान पुन्हा ज्या व्यक्ती लसीकरणासाठी जात असतील त्यांना लसीकरण या संदर्भातील माहिती देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारताला जर कोरोनामुक्त करायचे असेल तर नागरिकांनी स्वतःचे योगदान देणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
लसीकरणाला जातेवेळी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात
1) 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांनी जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असेल तर त्या रजिस्ट्रेशन / नोंदणीचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा यामध्ये रेफरन्स आयडी आपल्याला मिळत असतो तो रेफरन्स आयडी लसीकरणा च्या वेळेस पुन्हा नोंदणी केली जाते त्यासाठी आवश्यक असतो, अशावेळी आपण आपला मोबाईल क्रमांक ज्याद्वारे आपण रजिस्ट्रेशन केले तो सोबत न्यावा.
2) ऑफलाइन रजिस्ट्रेशन किंवा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करतेवेळी सुद्धा आपल्याजवळ मोबाईल क्रमांक ज्या वर ओटीपी येईल असा नेणे अनिवार्य आहे,
3) ऑफलाइन रजिस्ट्रेशन किंवा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन केल्यानंतर गेटमधून आत गेल्यानंतर पुन्हा संगणकावर आपल्या लसीकरणाची नोंद करावयाची असते अशावेळी बाहेरून आल्यानंतर लगेच लसीकरण केंद्रात जाऊ नये आपले रजिस्ट्रेशन झाल्याची खात्री करावी त्यानंतरच लस घ्यावी,
शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या रांगेत उभे आहोत ती रांग कोणती आहे हे तपासूनच त्या रांगेत उभे राहणे सोयीस्कर असते,
नागरिकांनीही आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित असते नागरिकांचे चांगले वर्तन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते त्यामुळे सहाजिकच नागरिकांनाही योग्य सुविधा मिळणे सुकर होते.
मालेगाव लाईव्ह याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करते की कृपया लसीकरणाला जाताना वरील सर्व गोष्टींचे पालन करणे आपल्या सोयीसाठी आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे!
सोयगाव आरोग्य केंद्रात शुक्रवारी लोकप्रतिनिधी व समाजसेवकांचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे समाजसेवकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा अशी विनंती आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी केली आहे
