इलेक्ट्रिक वाहनांच्या सुविधांना चालना देण्यासाठी नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाने येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू केल्याने देशातील इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळण्यास मदत होईल - असे नॅशनल अथॉरिटी सांगितले
जाणून घ्या याविषयी सविस्तर
▪️ नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार - राष्ट्रीय महामार्गांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित केल्याने इलेक्ट्रिक वाहन धारकांना बरीच मदत मिळेल
▪️ लाबंच्या प्रवासासाठी बॅटरीवर चालणाऱ्या कार वापरण्याच्या - मर्यादांबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते तसेच सध्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी महामार्गावर ईव्ही चार्जिंगची मोजकीच स्टेशन आहेत
▪️तसेच भारतात लवकरच जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र होईल - या दशकाच्या अखेरीस भारताच्या सर्व कारपैकी 70 टक्के, खासगी कारपैकी 30 टक्के, बसपैकी 40 टक्के -
▪️ त्याचबरोबर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांपैकी 80 टक्के इलेक्ट्रिक वाहने बनविण्याचा निर्णय घेतला आहे - असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
सध्या हे चार्जिंग स्टेशन्स कोण चालवणार, याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, परंतु जर पेट्रोल पंप प्रमाणेच खाजगी चार्जिंग स्टेशन करण्याची परवानगी मिळाली तर यातून बक्कळ पैसा कमावण्याची सुवर्णसंधी मिळू शकते!