मालेगाव (जय योगेश पगारे - कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क ) आपल्यापैकी बऱ्याच जणांना हनी ट्रॅप प्रकार माहित असेलच, मोठमोठ्या असामी, पुढारी,नेते, उद्योगपती, शासकीय अधिकारी यांच्याशी सोशल मीडिया व वॉट्सअँप वर जवळीक वाढवून त्यांना संबंध ठेवण्यास लावून नंतर ब्लॅकमेल करणाऱ्या अनेक 'अप्सरां' बद्दल अनेक बातम्या आपण ऐकल्या असतीलच,
याशिवाय मंदिराचे जेसीबी ने खोदकाम करतांना सोन्याच्या विटा सापडल्या व त्या लवकर विकायच्या आहेत असे सांगून लालची लोकांना लुटण्याचे अनेक प्रकार घडले आहेत, परंतु अपमान व बदनामी होऊ नये म्हणून याबद्दल फसवणूक झाली असताना सुद्धा पोलिसात तक्रार देण्याऐवजी लोक गप्प राहणे पसंत करतात.
परंतु आता या लुटारूनी एक नवीन युक्ती शोधून काढलीय, एखाद्या विदेशी सुंदर मुलीचा फोटो डीपी ला ठेवून आंतरराष्ट्रीय नंबर घेऊन चांगल्या दिसणाऱ्या नम्बर्स ला टार्गेट करायचे उद्योग सुरू केलेत, आधी ते दुसऱ्या कुणासाठी आपण मेसेज केला असे भासवतात नंतर समोरची व्यक्ती कडून प्रतिसाद मिळाला की पुढे हळू हळू समोरच्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न करतात मग मग काय अपेक्षा प्रमाणे समोरच्या व्यक्तीचा प्रतिसाद मिळाला मग त्याला कचाट्यात ओढून एकतर बँकेतले पैसे लुटतात, किंवा अश्लील विडिओ कॉल करून तो व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याची भीती दाखवत ब्लॅकमेल करून पैसे उकळतात.
त्यामुळे अश्या प्रकारे कोणत्याही मुलीचा मेसेज आल्यास सरळ ब्लॉक करा 👍
Tags
honey trap