*मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद, त्यापूर्वीच करुन घ्या महत्त्वाची कामे*
🔸नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यातील काही सुट्ट्या या राज्यापुरती मर्यादित आहे. तर काही सुट्ट्या या प्रादेशिक बँकांपुरत्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास तुम्हाला सुट्ट्यांबद्दलची माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलात तर तुमची चक्कर वाया जाईल.
📃 *मे महिन्यातील बँकेच्या सुट्टीची यादी*
1 मे – शनिवार – महाराष्ट्र दिन / कामगार दिन
2 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
8 मे – दुसरा शनिवार – आठवड्याची सुट्टी
9 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
13 मे – गुरुवार – ईद (ईदच्या उत्सवामुळे श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि कानपूरमधील बँका बंद राहतील.)
14 मे – शुक्रवार – परशुराम जयंती / ईद / अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपूर येथे या दिवशी बँका खुल्या असतील.)
16 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
22 मे – चौथा शनिवार – साप्ताहिक सुट्टी
23 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
26 मे – गुरुवार – बुद्ध पूर्णिमा
30 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
Tags
Bank Holidays